थरार : पूर्ववैमनस्यातून भरसकाळी घरात घुसून तरुणावर गोळीबार

सप्टेंबर 23, 2021 9:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ सप्टेंबर २०२१ | शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या आकाश सपकाळे या तरुणावर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास चौघांनी घरात घुसून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.

murder 1

जळगाव शहरातील कांचननगर परिसरात असलेल्या समर्थ बैठक हॉलजवळ आकाश मुरलीधर सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चार ते पाच जणांपैकी एकाने त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्यावर गोळीबार केला. आकाशच्या कुटुंबीयांनी प्रतिकार केल्याने हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पायरीवरून पाय घसरून तो पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला.

घरात ४ काडतूस पडल्या असून घरा बाहेर १ गावठी कट्टा आणि १ काडतूस पडले आहे. घटनास्थळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे पथकासह पोहचले असून तपास सुरू आहे. दरम्यान, ४ हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून हल्ल्यात २ पिस्तुलाचा वापर झाल्याचे समजते. वाद पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/227863039400931/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now