जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । मेहरूण तलावाच्या सांडव्याला भगदाड पडल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी होत होती. अखेर आज महापौरांनी दखल घेत स्वतः उभे राहून काम करून घेतले. विशेष म्हणजे, यामुळे मेहरूणचे वैभव वाचले आहे.

मेहरूणकडे जाणारे रस्त्यावरील पाणी अडवून ठेवणारी बांध कोणी अज्ञात व्यक्तीने तोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते. याबाबत जळगाव लाईव्ह न्यूजने ‘मेहरूण तलावाच्या सांडव्याला भगदाड, हजारो लीटर पाण्याची नासाडी’ या मथड्याने बातमी प्रसिद्द केली होती. दरम्यान, आज महापौरांनी दखल घेत महानगरपालिकाचे ट्रॅक्टर, जेसीबी आणि कर्मचारी यांच्याकडून स्वतः उभे राहून काम करून घेतले. यामुळे मेहरूणचे वैभव वाचले आहे.
*पहा विडिओ प्रेक्षपण :*
https://youtu.be/ywyp-D_LYu4