जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री करणे एका रेशनदुकानदाराला चांगलेच भोवले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील आजाबराव सिताराम पाटील या रेशनदुकानदारावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते.
पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहे.
हे देखील वाचा :
- श्रीराम संस्थानतर्फे मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त कीर्तनासह महाभिषेक
- 10वी पास उमेदवारांसाठी गोल्डन चान्स ! रेल्वेत विनापरीक्षा थेट 3612 जागांसाठी भरती
- वेश्याव्यवसायाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल
- विद्यार्थ्यांची यंदा होणार सेतू अभ्यासक्रमातून उजळणी
- माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर माळी
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज