जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच यावल तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह अरस्तू वास्तव्याला आहे. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात असताना तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तिचा परिसरात आणि नातेवाइकांकडे शोधाशोध केली.
परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. या संदर्भात अल्पवयीन मुलीचे वडील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात अपघाताचे सत्र थांबेना! ट्रॅक्टरच्या धडकेत जामनेरच्या महिलेचा मृत्यू
- धरणगाव तालुक्यात बसला पुन्हा भीषण अपघात ;एकाच मृत्यू, २१ जण जखमी
- धरणगाव तालुक्यात एसटीला भीषण अपघात; 28 प्रवासी जखमी
- जळगावात अपघाताचे सत्र थांबेना! तीन अपघातात चारजण ठार
- जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त..