⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करा : मराठा समाज

बकाले यांच्यावर गुन्हा दाखल करा : मराठा समाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले चांगलेच चर्चेत आले आहे. त्याच्याविरोधात राज्यासह जिल्ह्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून विविध ठिकाणी निषेध केला जात आहेत. अमळनेर येथे देखील मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून संभाजी ब्रिगेड व तालुका मराठा समाजातर्फे पोलीस स्टेशनला शिष्ट मंडळाने ठिय्या मांडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आपल्या पोलीस दलातील सहकाऱ्याशी दूरध्वनी वर संभाषण करतांना मराठा समाजाबद्दल अतिशय खालच्या स्थरावर जाऊन वक्तव्य केले असून अशा वक्तव्यांमुळेच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असते. या वक्तव्यामुळे फक्त मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज दुखावला गेला असून भविष्यात कुठल्याही समाज-धर्मा विषयी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य कुठल्याही व्यक्तीकडून व्हायला नकोत म्हणून अशा विकृत लोकांना अद्दल घडवण्यासाठी त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे. व कलम ३५४ , २९५ (A) , १५३ (B) , ५०५ (B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समस्थ समाज बांधवांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभाग अध्यक्ष श्याम पाटील, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, संजय पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, कैलास पाटील, गौरव पाटील, मनोहर पाटील, शिवाजी पाटील, जयप्रकाश पाटील, संजय पुनाजी पाटील, स्वप्निल पाटील, जितेंद्र देशमुख, डॉ.सुमित पाटील, जयंत पाटील, अक्षय चव्हाण, मयूर पाटील, विशाल पाटील, शुभम पाटील, दर्पण वाघ, अभिषेक धमाळ, उज्वल मोरे, तेजस पवार, अक्षय पाटील, आशुतोष पाटील, अभिजित वाघ, राज पाटील यांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी जळगाव येथे किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगितले त्यामुळे हिरे यांच्या अश्वासनांनंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जर २४ तासात जळगाव येथे गुन्हा दाखल न झाल्यास मराठा समाज अमळनेर येथे महिलांसह मोठ्या प्रमाणात मोर्चा काढेल असा इशाराही देण्यात आला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह