जळगाव जिल्हाजळगाव शहर

‘योगा’च्या बहाण्याने घराबाहेर पडली, ‘मदुराई’ला जुन्या प्रेमासोबत संसाराची गाठ बांधली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । शहरातील २१ वर्षीय विवाहिता नऊ महिन्याच्या मुलीला घेऊन योगा व प्राणायाम करायला जात असल्याचे सांगून घराच्या बाहेर पडली. अख्खा दिवस गेला तरी मायलेक घरी न आल्याने इकडे पतीची चिंता वाढली. शेवटी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी महिनाभराच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करीत पतीकडे आली. आता या दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला आहे. दोघींच्या ठिकाणाचा शोध लागला. पोलीस तेथे धडकले तर विवाहितेचं जुनं प्रेम ताजं झाले, त्यातून या प्रियकर व प्रेयसीने नव्या संसाराची गाठ बांधली होती. दोघांचे समुपदेशन केल्यानंतर विवाहिता व मुलीला पोलिसांनी जळगावात परत आणून पतीच्या स्वाधीन करीत या प्रेमकथेचा शेवट केला.

शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २१ वर्षीय विवाहिता १० नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी सात वाजता योगा व प्राणायाम करायला चालली आहे असे सांगून नऊ महिन्याच्या मुलीला घेऊन घरातून निघाली. सोबत जाताना सोन्याची साखळी, बाळ्या दोन सोन्याच्या अंगठ्या असे दागिने घेऊन ही विवाहिता मदुराई येथे पोहोचली. इकडे पत्नी घरी आली नाही म्हणून पतीची चिंता वाढली. संपूर्ण शहर, रेल्वे स्टेशन व नातेवाईक यांच्याकडे चौकशी केल्यानंतर काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पतीने शनिपेठ पोलीस ठाण्यात जाऊन हरविल्याची तक्रार नोंदवली. तब्बल महिनाभराने ही विवाहिता मदुराई शहरात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बळीराम मोरे यांनी पोलीस अंमलदार परीश जाधव, अनिल कांबळे, राहुल घेटे, महिला पोलीस अंमलदार दीपिका महाजन व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र न्याती यांचे एक पथक तामिळनाडूतील मदुराई येथे पाठवले. तेथे गेल्यावर महिलेने एका तरुणासोबत संसार थाटल्याचे दिसून आले.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत या विवाहितेने संबंधित तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाल्याचे सांगितले. पथकाने खोलात जाऊन चौकशी केली असता संबंधित तरुणासोबत तिचे लग्नाआधीपासून प्रेम प्रकरण होते. सध्या ज्याच्या सोबत लग्न केले तो पती आवडत नाही, म्हणून प्रियकरासोबतच संसार थाटल्याचे तिने मान्य केले. दरम्यान, पोलिसांनी विवाहिता व तिचा प्रियकर या दोघांचे समुपदेशन केले. दोघांनाही आपली चूक मान्य झाली. विवाहिता पोलिसांसोबत थेट जळगावात पतीकडे आली. आता या दोघांचा संसार सुरळीत सुरु झाला आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button