⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

गुर्जर प्रिमीयर लीगचे विजेतेपद धरतीधन चोपडा संघाने पटकाविले…

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । शहरातील मानराज पार्क येथे आयोजीत गुर्जर प्रिमियर लीग सीजन चारचे विजेतेपद धरतीधन चोपडा या संघाने पटकाविले आहे. धरतीधन चोपडा या संघाने त्रिमुर्ती फाऊंडेशन या संघाचा ५३ धावांनी पराभव केला. समस्त गुर्जर समाजबांधवांकडून या स्पर्धेचे आयोजन ११ ते १५ जानेवारीदरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघानी सहभाग घेतला.

अंतीम सामन्यात धरतीधन संघाने १० षटकांमध्ये १३२ धावा केल्या होत्या. तर त्रिमुर्ती संघ केवळ ८० धावांवर सर्वबाद झाला. अंतीम सामन्यात चोपडा संघाचे कर्णधार शंशांक पाटीलने सामनाविराचा पुरस्कार पटकाविला. बक्षिस समारोपप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासह अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, दोडे गुर्जर संस्थानचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, त्रिमुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ॲड.हर्षल चौधरी, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, भुषण पाटील, सचिन चौधरी, प्रशांत पाटील, डॉ.राहुल महाजन, डॉ.रवी महाजन, शंकुतला पवार, विजय चौधरी, डॉ.दीपक चौधरी, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.दीपक पाटील, शामकांत पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयकर अधीक्षक हिरालाल पाटील, प्रा.दिनेश पाटील, ॲड.विरेंद्र पाटील, अविनाश पाटील ,गोपाल पाटील, कमलाकर पाटील, सुरज पवार, हर्षल चौधरी, आशिष पाटील, माही जाधव, महेंद्र पाटील, कल्पेश पाटील यांनी प्रयत्न केले.