⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | कृषी | शेतकऱ्यांनो काळजी द्या : जिल्ह्यात ‘कुकुंबर मोझॅक’ चा शिरकाव

शेतकऱ्यांनो काळजी द्या : जिल्ह्यात ‘कुकुंबर मोझॅक’ चा शिरकाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ ।  जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील केळीवरील संकटे कमी होण्यास तयार नाही. करणं आठवडाभरापासून केळी पट्ट्यात नवीन बागांमध्ये कुकुंबर मोझाक व्हायरसने शिरकाव केला आहे. हे प्रमाण तूर्त एक हजार खोडांमध्ये २ ते १५ रोपे एवढे असले तरी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास बाधित खोड उपटून फेकण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे केळी उत्पादक धास्तावले. (Cucumber mosaic virus in jalgaon)

जिल्ह्यातील केळीवरील संकटांची मालिका कायम आहे. कधी वादळ, गारपीटीने होणारे नुकसान, तर कधी अती तापमान व कडाक्याच्या थंडीने बसणारा फटका शेतकऱ्यांना नवीन नाही. त्यात पडणारे बाजारभाव, होणाऱ्या लुटीमुळे केळीचे अर्थकारण गडगडते. दरम्यान, मागील हंगामात २ हजारापर्यंत विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी यंदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, कपाशी पिकावर पांढरी माशी आल्यानंतर येणाऱ्या सीएमव्हीमुळे केळीचा प्लॉट वाया जाण्याचा धोका वाढला आहे. रावेर, यावल तालुक्यात काही ठिकाणी सीएमव्हीचा प्रादुर्भाव जाणवण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी केळी बागेवर फवारणी करत आहे.

लक्षणे

पानांवरील हरितलवकांचा नाश झाल्याने पानांवर आडवे, मध्यभागी चट्टे पडतात. केळीच्या पोंग्यावर प्रादुर्भाव झाल्यास तो सडतो. परिणामी रोपे मरतात.

उपाययोजना

बागेच्या सभोवताली असलेली तणे काढावे, बागेमध्ये वेलवर्गीय पीक घेऊ नये, कृषितज्ञांच्या सल्ल्याने रसशोषक कीडींच्या बंदोबस्तासाठी फवारणी करावी.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह