जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल (Erandol) तालुक्यातील खडकी बु. येथील ६० वर्षीय शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी उघडकीस आली. हिम्मत फकीरा पाटील (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, खडकी बु. येथील हिम्मत पाटील यांची कोरडवाहू शेती होती. त्यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे पन्नास हजार रुपये व खाजगी सावकाराचे कर्ज होते. सततची नापिकी, पावसामुळे कपाशी आणि कांद्याचे झालेल्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेत ते होते. याच विवंचनेतून त्यांना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली.
आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जितेंद्र पाटील यांना वडील हिम्मत पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे त्यांनी गावातच राहत असलेल्या चुलत भाऊ भरत संतोष पाटील यांना माहिती दिली. सुनील सुकलाल पाटील, जितेंद्र पाटील, भरत पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हिम्मत पाटील याना ग्रामीण रुग्णालयात (Hospital) आणले असता ते मयत झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत भरत संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.
मयत हिम्मत पाटील यांचे पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, सुना असा परिवार आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा