⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

डोंगर कठोरा येथे आदीवासी शेतमजुराची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ ।  तालुक्यातील डोंगर कठोरा येथे राहणाऱ्या व क्षेतमजुरी करणाऱ्या एका आदीवासी मजुराने शेतात गळफास घेवुन आत्मह्त्या केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. गुलाब शंकर बारेला (वय ५५ रा.गाडग्या पाल) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

याबाबत असे की, डोंगर कठोरा येथे डॉ. राजेंद्र झांबरे यांच्याकडे सालदारकीस असलेल्या आदीवासी शेतमजुर गुलाब बारेला व त्याची पत्नी हे दोघ सकाळी शेतात कामास गेले असता गुलाब बारेला याने पत्नी मी पाणी देवुन येतो असे सांगुन गेला. तो बऱ्याच वेळ परत न आल्याने पत्नीने शेतातच शोध घेतला असता शंकर बारेला याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला.

या घटनेची माहिती मिळताच शेत मालक डॉ राजेन्द्र झांबरे यांच्यासह गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे व नागरीकांनी शेतकडे धाव घेतली. शंकर बारेला याचे मृतदेह शवविच्छेदना करीता यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत आहे. मयत हा डॉ. राजेन्द्र झांबरे यांच्याकडे मागील पाच वर्षापासुन शेतात सालदारकीस होता तो त्याच्या कुटुंबासह डोंगर कठोरा गावातील डॉक्टर यांच्या खळयात राहात होता. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली दोन मुले असा परिवार आहे.