⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोलला जल्लोषात बाप्पाला निरोप, स्वच्छता मोहीम राबवली!

एरंडोलला जल्लोषात बाप्पाला निरोप, स्वच्छता मोहीम राबवली!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे शुक्रवारी सकाळपासून वाजत गाजत मिरवणूक काढून गणेश मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. यावेळी ट्रॅक्टर, कार व रिक्षा या वाहनाद्वारे श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढून अंजनी नदीच्या पात्रात तसेच जुने पद्मालय येथे तलावात गणपती विसर्जन केले. विशेष म्हणजे, सालाबाद प्रमाणे १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री विसर्जन मिरवणूक काढून कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदी पात्रात गणपती विसर्जन केले. जय गुरु व्यायाम शाळेचा पहिला मानाचा गणपतीचे प्रारंभिक विसर्जन होऊन त्या पाठोपाठ इतर मंडळाच्या गणपतीचे पहाटेपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत पार पडला. प्रांत अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याकामी विशेष लक्ष दिले.


शुक्रवारी संध्याकाळी मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावून गणपतीला निरोप दिला. पाऊस थांबल्यानंतर सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती क्रमनिहाय रांगेत येऊ लागले. या विसर्जन मिरवणुकीत जय गुरु नागराज सावता माळी माहेश्वरी ज्ञानदीप ब्रम्हवृंद आदी मंडळांनी सहभाग घेतला मंडळाचे कार्यकर्ते सजवलेल्या ट्रॅक्टर पुढे ढोल व तासाच्या तालावर थिरकत होते. यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या उत्साहाला उधाण आलेले दिसून आले. महिला पुरुष व मुले यांची मोठी गर्दी झाली.
नगरपालिकेतर्फे सर्व मंडळाच्या गणपतीचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

तसेच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काही मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन बंधुभाव व जातीय सलोखा जपण्याची परंपरा यावेळी ही कायम राखली. व पीर बाथरूम बुवा मस्जिद ट्रस्ट तर्फे गणेश मंडळांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मंडळाच्या गणपतीचे स्वागत करण्यात आले. पो. नि. ज्ञानेश्वर जाधव सहा. पो. नि. गणेश अहिरे पीएसआय बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निर्माल्य गोळा करून ते नगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोवर जमा केले अशाप्रकारे त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह