खडसे विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

फेब्रुवारी 22, 2022 12:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर येथील खडसे सेमी इंग्लिश मेडिकल स्कुलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम खासदार रक्षाताई खडसे व मुक्ताईनगर पोलीस उपनिरीक्षक परविन तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

K. school jpg webp

आजची परिस्थिती बदललेली असून विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींचे अनुकरण न करता योग्य रीतीने व आत्मसात केलेल्या कौशल्याने आपले जीवन आजच्या युगानुरुप आधुनिक करावे असे मनोगत यावेळी खासदार रक्षाताई खडसे व्यक्त करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल मार्गदर्शन केले.

शाळेचे शिक्षक गणेश कोळी यांनी गुरु शिष्य यावर आधारित स्वयम् रचित कविता सादर करून सर्वांना भावनाविवश केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य व्ही.के.वडस्कर, शिक्षक सरदार, स्वप्निल चौधरी, गणेश बोदडे, वैभव पाटील, शिक्षक निळे, मालगे, सतिश गायकवाड तथा शिक्षिका राजश्री फेगडे, करुणा देशमुख, दिपाली वाघुळदे शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now