कुटूंबाला मारहाण करणारे पोलिसांच्या जाळ्यात

एप्रिल 30, 2022 1:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । शहरातील कुसुंबा येथे अंगणात झाडत असताना किरकोळ वादातून महिलेसह मुलींना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

crime 12 1 jpg webp

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी कविता सोनवणे या अंगणात झाडू मारीत असतांना त्यांची मुलगी, नात व मुलाला त्यांच्या शेजारी राहणारे चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दि २५ फेब्रुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार झाले होते. यातील संशयित तुषार विलास कोळी (वय-१९) व सचिन नारायण कोळी (वय-२३) दोघ रा. कुसुंबा यांना गावातून ताब्यात घेतले तर रविंद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (वय-३६) व प्रवीण शांताराम कोळी (वय-४०) यांना न्यायालयात राखीव पोलीस कोठडी असलेल्या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गफूर तडवी, पो.कॉ सिध्देश्वर डापकर, पो.ना. अतुल पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, नाना तायडे, गोविंदा पाटील यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now