---Advertisement---
जळगाव शहर

हायटेक महापालिका ; सोशल मीडियावरुन जळगावकरांना मिळणार या सुविधा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ ऑक्टोबर २०२३ | सोशल मीडियाच्या युगात कोणतीही माहिती एका क्लिकवर एकाचवेळी लाखों लोकांपर्यंत पोहचते. जळगाव महापालिकेने याच सोशल मीडियाचा वापर करुन लाखों जळगावकरांशी संवाद सुरु केला आहे. महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सूचना, निवेदन आणि सेवांची माहिती तत्काळ जळगावकरांना मिळावी या उद्देशाने सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे.

Jalgaon Mahapalika jpg webp

जळगाव महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सेवासुविधा, योजना, पाणीपुरवठा वेळापत्रकातील बदल आणि इतर सूचनांची माहिती नागरिकांना लागलीच मिळावी म्हणून महापालिकेच्या वतीने JCMC Digital या नावाने फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू करण्यात आले आहे.

---Advertisement---

नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी माहितीपूर्ण व्हिडीओ देखील प्रसारित केले जाणार आहेत. जन्म दाखला, मृत्यू दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि इतर कामांसाठी कोणत्या विभागात जावे, कोणती कागदपत्रे लागतात, शासकीय शुल्क याची माहिती देणारी व्हिडीओ शृंखला ‘आता मी काय करू?’चे लोकार्पण केले जाणार आहे.

महानगरपालिकेतर्फे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलही सुरू करण्यात आले असून, त्यावरदेखील नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे. या चॅनेलची लिंक मनपाच्या सोशल मीडिया खात्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका टीमची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या मार्फत सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या खात्यांना लाइक व फॉलो करावे, ज्यामुळे माहिती लागलीच उपलब्ध होईल, असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---