विदगाव परिसरात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळल्याने खळबळ!

ऑगस्ट 4, 2022 4:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । विदगाव परिसरात एक बेवारसरित्या वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.

crime murder

तालुक्यातील विदगाव येथे मंगळवार २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एका अंदाजे ७० वर्षीय अंदाजे मृतदेह बेवारसरित्या आढळून आला. विदगाव येथील ग्रामस्थांनी तातडीने जळगाव तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

दरम्यान पोलिसांनी मयताची ओळख पाठवावी असे आवाहन जळगाव तालुका पोलीसांनी केले आहे. याबाबत बुधवार ३ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नजन पाटील करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now