जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार गुलाबरावजी पाटील यांच्याकडून गरीब, गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पी.आर. सोनवणे व शिक्षक बंधू – भगिनी यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी एच.डी.माळी, सी.एम.भोळे, पी.डी.पाटील, व्ही.पी.वऱ्हाडे, एम.जे.महाजन, ज्येष्ठ लिपीक जे.एस.महाजन, पी.डी.बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, अशोक पाटील, जीवन भोई, प्रदीप पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.टी.माळी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले