⁠ 
शनिवार, मे 18, 2024

विद्यापीठात ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना टेस्ट करावी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची अँटीजन चाचणी करावी, जेणेकरून कोरोनाचा विद्यापीठ परिसरात होणारा फैलाव रोखला जाईल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर सचिव ऍड.कुणाल पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे. 

ऍड.कुणाल पवार यांनी दिलेला निवेदनात म्हटले आहे की, मागील बऱ्याच काळापासून आम्ही विद्यापीठमधील भोंगळ कारभारविषयी आवाज उठवत असून तिथल्या पिळवणूकविषयी वारंवार समस्या मांडत आहोत, परंतु तिथल्या काही विशिष्ट मंडळी ह्या व्यक्तीगत स्वार्थासाठी सर्वाना वेठीस धरत आहेत तसच एक प्रकरण हे आहे.

विद्यापीठातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्यावर देखील विद्यापीठमध्ये काही लोकांची बिले काढण्यासाठी त्यांच्या दालनात आले व अधिकारी व कर्मचारी यांच्यात मिसळले. टेस्ट पॉझिटिव्ह असतानाही ते घरी बसले नाही किवा त्यांची टेस्ट झाल्याचे इतरांना कळवले नाही. त्यांच्या  या आडमुठेपणामुळे इतर लोकांचा जीव धोक्यात आलेला असून त्यांच्यावर शासन नियमांच्या अधीन राहून कारवाई करावी. तसेच विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीची मुख्य प्रवेशद्वारवर टेस्ट करून त्यांनामध्ये प्रवेश द्यावा असे आदेश तात्काळ देण्यात यावे जेणे करून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही व परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही अशी विनंती अँड.कुणाल पवार यांनी केली आहे.