जळगाव जिल्हा

‘जागतिक एड्स डे’ निमित्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक एड्स डेच्या निमित्ताने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (छडड), मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभाग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग विभाग, यूथ रेड क्रॉस आणि रेड रिबिन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयात रेड रिबिन क्लबची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृतीसाठी, बाबत स्किट सादरीकरण केले, आकर्षक पोस्टर प्रदर्शन आणि रांगोळी काढून आपले सर्जनशील कौशल्य दाखवले. कार्यक्रमात प्राचार्य विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना जागतिक एड्स डेच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक (मेडिकल सुपरिंटेंडेंट) प्रेमचंद पंडित , दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी प्रा. अश्विनी वैद्य, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. निम्मी वर्गीस, प्रा. डॉ. प्रियदर्शनी मून आणि प्रा. निर्भय मोहोड , शिक्षक वृंद यांचीही विशेष उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना एड्ससंदर्भात जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय, आणि त्यासंबंधीच्या शासकीय योजनांची सखोल माहिती देण्यात आली.

रेड रिबिन क्लबच्या माध्यमातून भविष्यात एड्सशी संबंधित जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि समाजहिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button