Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

खंडीत पाणीपुरवठ्यामुळे एरंडोलकर त्रस्त

nal
चेतन पाटीलbyचेतन पाटील
July 18, 2021 | 4:54 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । अंजनी धरणातून एरंडोल शहरासाठी नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ नियोजनाअभावी नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने विशेषत: महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कधी व्हाॅल नादुरूस्त, पाईपलाईन फुटली तर कधी वीज पुरवठा खंडीतच्या सबबी नपाकडून सांगितल्या जातात. मागील वर्षापासून (मार्च २०२०) शहरात कोरोना महामारीने नागरीक हैराण झाले आहेत. 

त्यामुळे नेहमी हात धुवून (एक मिनीट तरी) घरातच राहा या शासनाच्या पर्यायाने, नपाच्या आदेशांमुळे पाणी वापर जास्त होणारच. त्यातच लहान मुले पाण्याचा वापर जास्तच करतात. त्यामुळे घरातील लहान मोठ भांडे भरून देखील पाणी पुरले नाही. भर उन्हाळ्यात देखील कधी ५ व्या तर कधी ६ व्या दिवशी शहरात नपामार्फत पाणी पुरवठा केला जाता यास म्हणावे तरी काय? काहीही तांत्रिक अडचण नसेल तव्हा आठवड्यातून एकच दिवस नळांना पाणी पुरवठा केला जातो म्हणज जर सोमवारी पाणी सोडले तर शुक्रवारीचे पाणी सोडणार हे ठरलेलेच परंतू वरील अडचणी (व्हाॅल, पाईपलाईन, वीजपुरवठा) उद्भवल्यास मात्र दुसऱ्या दिवशी (म्हणजे ६ व्या दिवशी) पाणी येणार.

आता बोला, काय करतील नागरीक आणि महिला? विशेष खेदाची बाब म्हणजे ज्या प्रभागात पाणी पुरवठा होणारा आहे त्यासाठी कमीतकमी शेवटच्या म्हणजे ४ थ्या दिवशी तरी १/२ नागरीकांना ( जबाबदार ) फोनद्वारे, व्हाट्सअॅपद्वारे मेसेज पाठविणे गरजेचे आहे परंतू इतकी तत्परता दाखवली तर ती नपा तरी कशी? त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा असून देखील केवळ नियोजनाअभावी नागरीकांना त्रास सहन करावा लागला आहे. तांत्रिक अडचणी समजू शकतात परंतू जून संपून जुलै सुरू झाला तो देखील अर्धा संपला तरीही ५ व्या, ६ व्या दिवशी पाणीपुरवठा होणे योग्य नाही.

एरंडोलचे नागरीक शांत , संयमी असल्याने कोरोना काळात सर्व प्रकारच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करून देखील नपाकडून वेळेवर पाणी पुरवठा होणे गरजेचे होते परंतू तसे झाले नाही . एरंडोल नपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष , कर्तव्यदक्ष मुख्याधिकारींनी लक्ष देण्याची गरज आहे . पाणीपुरवठा सुरळीत व्हावा हीच यानिमित्ताने अपेक्षा एवढंच ….

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in एरंडोल
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
bride

मामा-मामीची दलाली अडली, नवरी नवरदेवाला सोडून पळाली

accident near nmu

विद्यापीठाजवळ अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

corona update

जळगाव शहरासह जिल्ह्यातील १४ तालुके निरंक; वाचा आजची आकडेवारी

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.