एरंडोलजळगाव जिल्हा

एरंडोल राजामाता जिजाऊ महिला मंडळाची जिजाऊ सृष्टीला भेट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । एरंडोल येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे शिंदखेड राजा, मातृतिर्थ जिजाऊ सृष्टीला भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने कोरोना संसर्गामुळे शिंदखेड राजा येथील जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतू, मर्यादीत लोकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी एरंडोलच्या राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेडने कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा माधुरीताई भदाणे आणि उपस्थित होते. दरम्यान, आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने उपस्थित सर्वच भारावले होते. तर छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांचे महान कार्य, पराक्रम घराघरात जाण्यासाठी संदेश मिळाला. तसेच कार्यक्रमात कोरोना संसर्गामुळे विधवा झालेल्या दोन मुलांच्या आईशी शिवधर्म पध्दतीने तरूणाने संमती देवून लग्नसोहळा पार पडला. सहभागी महिलांनी आकर्षक वेशभूषा, उत्कृष्ट संवाद सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यासाठी जळगांव जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मनिषा पाटील यांनी परिश्रमपूर्वक संवाद यासह सावित्रीबाई फुलेंची एकपात्री नाटीका सादर केल्याने सर्वांनीच कौतूक केले आणि शुभच्छा देखील दिल्यात.

याप्रसंगी शकुंतला अहिरराव, शशिकला जगताप, इंदिरा पाटील, शकुंतला पाटील, वंदना पाटील, रजनी काळे, शोभा पाटील, लता पाटील, सुरेखा पाटील, मनिषा पाटील यांनी कार्यक्रम सादर केला.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button