एरंडोलला खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सकांचे काम बंद आंदोलन

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । एरंडोल तालुक्यातील खाजगी पशुवैद्यकीय पदविका प्रमाणपञ धारक चिकीत्सक सेवादात्यांची बैठक नुकतीच पार पडली. 

त्यात पदविका व प्रमाणपञधारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परीषद कायदा १९८४ च्या पहील्या अनुसूचितांना समाविष्ट करणे, दि. २७ ऑगस्ट २००९ रोजीची शासन अधिसुचना रद्द करून सुधारीत अधिसुचना निर्गमित करणे, राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त असलेली पदे त्वरीत व प्रचलित पध्दतीने भरणे व राज्यात 12 वी नंतरचा 3 वर्षीय पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम सूरू करण्याबाबतच्या मागण्यांसाठी सूरू असलेल्या पशुचिकित्सा खाजगी व्यवसायी संघटना महाराष्ट्र यांना पाठींबा देत जोपर्यंत या सर्व मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले जाणार आहे.

 तालुक्यातील कोणतेही खाजगी पशुवैद्यकीय चिकीत्सक सेवादाते सेवा देणार नसल्याचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष एन. के. जाधव, सचिव शिवकुमार देवरे यांनी सांगीतले. 

याप्रसंगी डॉ. शांताराम पाटील, प्रमोद देवरे, भाऊसाहेब पाटील, चंपालाल पाटील, शैलेश चौधरी, हर्षल पवार, नंदलाल सोनार, आकाश महाजन, रणविर पाटील, आसीफ कुरेशी यांचेसह तालुक्यातील सर्व खाजगी पशुचिकित्सक सेवादाते उपस्थित होते.