जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका व नवनिर्मित नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा २३ ऑगस्टपासून तयार करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.
एरंडेल नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी विकास नवाले यांनी दिली . महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी शुक्रवारी ता . २० रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत . ज्या नगर परिषदा व नगर पंचायतींची मुदत डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत संपत आहे तेथे मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे . एरंडोल- नगर पालिकेची मुदत डिसेंम्बर मध्ये संपत असल्याने आगामी निवडणुकीसाठी शहरांचा प्रभागानुसार प्रारूप आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यासाठी सन २०११ ची जनगणना व शहराचा नकाशा विचारात घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकरी यांनी सांगितले .
एरंडोल-नगर पालिका चे एकूण 20 नगर सेवक आहेत. 2 स्वीकृत नगरसेवक असे एकूण 22 नगर सेवक आहेत.आता या नगरपालिकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे . त्यामुळे 20 प्रभाग रचना होणार आहेत त्यामुळे आजी माजी नगरसेवकाची तयारी सुरु झाली आहे.मागिल निवडणुक ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वात जास्त 9 शिव सेना चे 6 कांग्रेस चे 1 भाजपचे चे 4 असे नगरसेवक निवडून आले होते.लोकनियुक्त नगर अध्यक्ष भाजपचे होते. आता परत भाजपचे किंग मेकर कडे मोठं आव्हान आहे. यावेळी नगराध्यक्ष लोकनियुक्त होते.तसेच नगराध्यक्ष पदासाठी रमेश परदेशी,मनोज पाटील,दशरथ महाजन , विजय महाजन यांच्या मध्ये लढत होती.
यावेळी नगरसेवक 1. मोमीन अब्दुल शकुर अलतीफ 2.अभिजीत राजेंद्र पाटील ,3.सौ.वर्षा राजेंद्र शिंदे ,4.सो , दर्शना विजयकुमार ठाकूर ,5.सौ.हर्षाली प्रमोद महाजन ,6.सौ.छाया आनंद दाभाडे, 7.नितीन सदाशिव महाजन नगरसेवक ,8. सौ.कल्पना दशरथ महाजन, 9..कुणाल रमेश महाजन ,10.सौ.जयश्री नरेंद्र पाटील ,11.सुरेश कालेश्वर पाटील,12 सौ.आरती अतुल महाजन ,13.योगेश युवराज देवरे,14 सौ.सुरेखा दशरथ चौधरी,15. शेख जहिरोद्दीन कासम ,16.बानोबी गुलाब बागवान 17.नितीन चैत्राम चौधरी,18 असलम रशिद पिंजारी ,19.सौ.सरलाबाई नथ्थु पाटील,20 सौ.प्रतिभा चिंतामण पाटील.असे नगरसेवक /नगरसेवीका आहेत.स्वीकृत 1. डॉ.नरेंद्र धुडकू ठाकूर २ . श्री.मनोज नथ्थु पाटील स्विकृत नगरसेवक आहेत.