कर्मचाऱ्याची समाधान.. एमओएचसह झाेनल ट्रेनिंग सेंटरला जीएम निरीक्षणात ५० हजाराचे बक्षिस
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) यांनी शुक्रवारी भुसावळ विभागाला भेट देत येथील एमओएच शेड व झाेनल ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन पहाणी केली. यावेळी झाेनल ट्रेनिंग सेंटरचे निरीक्षण करून त्यांना व एमओएच विभागाला प्रत्येकी ५० हजार रूपयांचे बक्षिस यावेळी महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहेटी यांनी जाहीर केले. यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहाेटी यांनी शुक्रवारी भुसावळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी इलेक्ट्रीक लाेकाे शेड (एमअाेएच) येथे भेट दिली. तेथील पहाणी केली. एमओएच शेड मध्ये असलेल्या वाढीव शेडचे निरीक्षण केले. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामांचा आढावा घेत, पुढील कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. एमओएच शेडमध्ये झालेल्या कामांची पहाणी करून त्यांनी तेथून रेल्वेच्या झाेनल ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. तेथील परिसराची पहाणी केली. तेथे लावण्यात आलेला नवीन सिमुलेटरचे निरीक्षण केले. तसेच माॅडेल रूमचे निरीक्षण केले. माॅडेल रूममध्ये प्रशिक्षणाच्या असलेल्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी प्रशिक्षणासाठी येत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिले जात असलेल्या जेवणाची क्लाॅलिटी पाहाणी केली. विशेष म्हणजे सर्व कर्मचारी जेवण करीत असलेल्या झाेनल ट्रेनिंग सेंटरच्याच भाेजनालयात महाव्यवस्थापक लाहाेटी व अन्य अधिकाऱ्यांनी सुध्दा जेवणाचा आनंद घेतला. यावेळी महाव्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी रेल्वेयार्डाची पहाणी केली. तेथील विविध लाईनींची पहाणी केली. एमओएच व झाेनल ट्रेनिंग सेंटरची पहाणी करून आल्यावर महाव्यवस्थापक लाहाेटी यांनी डीआरएम कार्यालयात येत तेथील अधिकाऱ्यांसाेबत गती शक्ती विषयावर मिटींग घेतली, यावेळी विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते, विभागात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. कामांच्या गतीचा आढावा घेतला. यावेळी डीआरएम राजेश कुलहारी, एडीआरएम नवीन पाटील, एडीआरएम रूखमय्या मिना यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.