जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुसऱ्या दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला नाही. २२ एप्रिल रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण झाले. या एकाच दिवशी हा रस्ता वाहतुकीसाठी उघडून पुन्हा बंद करण्यात आला.
तरसोद ते जळगाव या चौपदरीकरण महामार्गाचे लोकार्पण झाले. मात्र, या मार्गावरील नशिराबाद, भुसावळ व फेकरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण आहे. २२ एप्रिल रोजी महामार्ग प्राधिकारणाने केवळ एक दिवस हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला.
मात्र, दुसऱ्या दिवसापासून तो बंद करण्यात आला. परिणामी अजूनही केवळ एकाच बाजूचा दुहेरी मार्ग वाहतुकीसाठी वापरला जातो. यामुळे अपघातांची मालिका कायम आहे. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास येथे अपघात झाला. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
भुसावळ शहरातील जळगाव महामार्गावरील जुन्या आयटीआय परिसरातील याच पुलाची दुहेरी बाजू अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे.