जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । खासदार संजय राऊत यांनी ईडी कोठडीत जाण्यापूर्वी आपल्या आईंना लिहलेल्या भावनिक पत्र लिहिले होते. हे पत्र व्हायरल होत आहे. मात्र या बाबद मंत्री ना. गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. जेलमध्ये गेल्यावर भावना उफाळून येत असतात. सगळ्याच आरोपींच्या बाबतीत आपण हे पाहिलं आहे. असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
कालच खासदार संजय राऊत यांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. ईडीच्या कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून त्यांनी आपल्या आईला पत्र लिहितो आहे असे त्या पत्रात राऊत म्हणाले होते. या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राऊत यांनी पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यात काही हरकत नाही. भेट घेण्याची मागणी केली तर त्यांना भेटताही येईल. त्यांची भेट झाली तरी काही हरकत नाही. त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मला फारशी माहिती नाही. पण त्या भेटायला जाऊ शकतात. पत्रात काय लिहावं हा त्यांचा प्रश्न आहे. जेलमध्ये गेल्यावर भावना उफाळून येत असतात. सगळ्याच आरोपींच्या बाबतीत आपण हे पाहिलं आहे. तसंत त्यांनीही मत व्यक्त केलं असेल, असे ना. गिरीश महाजन म्हणाले.