⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांवर लाखोंची वीज बिल थकबाकी

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांवर लाखोंची वीज बिल थकबाकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । सध्या महाराष्ट्रात कोळशाचा तुटवडा आणि जवळजवळ 76,000 कोटींहून अधिकची थकीत वीज बिलांमुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणकडून वेगवेगळी पाऊले उचलली जात आहे. दरम्यान, अशातच महावितरणने थकबाकीदार खासदार आणि आमदारांची जिल्हानिहाय यादी तयार केली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांवर लाखो रुपयांची थकबाकी असलयाचे दिसून येतेय. वीज बिल न भरणाऱ्या लोकांमध्ये केंद्रीय मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांचाही समावेश देखील आहे.

जर सामान्य ग्राहकाने हजार रुपयांचे वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून वीज जोडणी तोडण्यात येते. मात्र, दुसरीकडे खासदार किंवा आमदार यांच्यावर हजारो, लाखो रुपयांची थकबाकी असली तरी देखील त्यांचा वीजपुरवठा अखंडपणे सुरू राहील. एकंदरीत राजकारण्यांवर कंपनी मेहरबान असल्याचे चित्र दिसून येतेय.

जळगावचे आमदार सुरेश भोळे(राजूमामा) यांच्याकडे महावितरणची जवळपास १,३४,७८८ रुपयांची थकबाकी आहे. तर यावल-रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याकडे देखील ६७,९६८ रुपयांची थकबाकी आहे.

राज्याचा विचार केल्यास सर्वात जास्त थकबाकी असलेले भाजपचे आमदार जयकुमार बी. गोरे असून त्यांच्याकडे जवळपास ७ लाख ३ हजार रुपयांची थकबाकी आहे. जे 2008 पासून प्रलंबित आहे. तर सर्वात कमी बिल रमेश के. कराड (1999) यांचे 107 रुपये, सुनील एस. शेळके यांचे 106 रु. (2011) निवासी बिल यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय यादी

मराठवाडा

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे (रु. ३१,७२५), सूरज लोलगे (रु. १,१३,२७९), विलास भुमरे (रु. १,५०,९८०)

जालना – रावसाहेब दानवे (रु. २१,६७४, रु. ३५,१९७, रु. २५,१९४, रु. १०,०९३, रु. ८०,८३६, रु. ८०,६३२), अमरसिंग खरात (रु. २,४२,२६७), बबनराव यादव (रु. १,०८,६५८)

बीड – रजनी पाटील (रु. ३,०७,९८४), प्रकाश सोळंके (रु. २१,१६०, रु. ५९,१७७), संदीप क्षीरसागर (रु. ३४,९७९, रु. ७०,३८७, रु. १,२३,०६४)

लातूर – संजय बनसोडे (रु. ५३,३१९), शिवाजीराव पाटील (रु. १७,९०७, रु. १३,१२२, रु. १९,६७६, रु. १९,६८०), बाबासाहेब पाटील (रु. १,४५,७७५, रु. १९,६८०)

उस्मानाबाद – ज्ञानराज चौगुले (रु. ४९,६९८, रु. २६,५०६), मधुकर चव्हाण (रु. ८०,९४८), रवींद्र गायकवाड (रु. ११,०८४, रु. १३,९७०)

परभणी – कल्याण रेंगे (रु. १,२७,९६२), सुरेश वरपुडकर (रु. २४,८६१, रु. २०,९२८)

कोकण

रायगड – नृपाल जयंत पाटील (रु. ३,६०,०३५), मानसी महेंद्र दळवी (रु. २,१६,६४८)

ठाणे – दिना पाटील (रु. ३८,७३७), रमेश पाटील (रु. १,१७,९८८)

उत्तर महाराष्ट्र

जळगाव – शिरीष मधुकरराव चौधरी (रु. ६७,९६८), सुरेश भोळे (रु. १,३४,७८८)

नंदुरबार – विजयकुमार गावित (रु. ४२,१३१)

अहमदनगर – शिवाजीराव कर्डिले (रु. ३८,१५१, रु. ५९,६७०), राहुल जगताप (रु. २८,५४९), रामदास शिंदे (रु. ८२,१४५), बाळासाहेब थोरात (रु. १०,८४९), राधाकृष्ण विखे-पाटील (रु. ११,१५२)

नाशिक – भुजबळ वाईन्स (रु. २४,०८८), दिलीप बोरसे (रु. ५७,९३०), संजय चव्हाण (रु. ५७,३२९, रु.२९,८२२), सुहास कांदे (रु. १९,१७६), हिरामण खोसकर (रु. २७,३४७, रु. २९,८२९, रु.२१,९३५)

विदर्भ

बुलढाणा – प्रताप जाधव (रु. ६४,२७३, रु. ६५,११०, रु. २२,३३०)

अमरावती – रवी राणा (रु. ३८,६७२), यशोमती चंद्रकांत ठाकूर (रु. ८८,२६७), राजकुमार पटेल (रु. ७३,८२०)

भंडारा – नाना पटोले (रु. १,३१,१६२, रु ४७,७६२, रु ७१,३२०, रु ४७,१६६)

नागपूर – अनिल देशमुख (रु. १,११,८९२, रु. १,२२,७५१), आशिष जैस्वाल (रु. १,३६,६८३, रु. १,९९,०२६), मोहन मते (रु. ३५,४७२)

पश्चिम महाराष्ट्र

पुणे – बापूसाहेब पठारे (रु. ३७,०८६), संग्राम थोपटे (रु. ८८,७३०), दिलीप मोहिते (रु. ७७,६६३, रु ८७,१७२, रु. २,६६,०३९)

सातारा – जयकुमार गोरे (रु. ७,०३,४७३), महेश शिंदे (रु.६८,१७१ )

सोलापूर – रणजितसिंह मोहिते-पाटील (रु. १४,०५६, रु. १,७१,१६०), प्रभाकर परिचारक (रु. १,११,७२७), राजेंद्र राऊत (रु. ७२,४१९, रु. २,४१,४४५, रु. १०,८७०), बबनराव शिंदे (रु. १०,९२१, रु.११,०७४, रु. १३,९४९, रु. १७,२४२, रु. १०,९२६, रु. १०,९२५, रु. ११,०७२), संजय शिंदे (रु. २७,९४१, रु. ६५,५५६, रु. ५१,३२७, रु. २१,४३४, रु. ९५,९६६, रु.५६,१७८)

कोल्हापूर – संभाजीराजे भोसले (रु. १,२५,९३२), राजेंद्र पाटील (रु.८९,१५०)

सांगली – विश्वजित कदम (रु. २४,०६३, रु. १८,२१०), अनिल बाबर (रु. २४,२२२), दत्तू खाडे (रु. ३७,७४७, रु. २५,७२७, रु. २९,४९२, रु. ३४,६९४, रु. ७९,७१५, रु. ७९,७१५, रु.१,३९,३९५, रु.५१,८६५, रू.४९,८९५), सुमन सदाशिव खोत (रु. ११,८४२, रु. १,२३,५९१), विक्रमसिंह सावंत (रु. १,२७,६६८), शिवाजीराव नाईक (रु. ६२,१४१), सुरेश पाटील (रु. २४,१३७, रु. २४,३५२)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.