⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

रावेर तालुक्यात सहा विद्युत मोटार पंप फोडून तांब्याच्या तारांची चोरी ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील तापी परिसरात सुदगांव या गावामध्ये रात्री अज्ञात चोरांनी तब्बल सहा विद्युत मोटारपंप फोडून त्यातून तांब्याचे तार काढत चोरी नेले. या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भितीने वातावरण निर्माण झाले आहे.

ही तापी परिसरामधील पहीली घटना नसुन या आधीही वेळोवेळी अशा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. १) रघुनाथ लंके २) पांडूरंग जनार्दन ३) विश्वास तायडे ४) हेमंत सरपटे ५) गोकुळ कोळी ६) पांडूरंग पाटील या शेतकऱ्यांच्या मोटारी फोडल्या गेल्या असून या चोरीची घटनांमुळे शेतकरी हा पूर्णताहा हवालदील झाला आहे.
सतत होत असलेल्या विद्युत मोटर पंप चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांनमध्ये तसेच नागरिकांमधे प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.

चोरट्यांपुढे प्रशासन हतबल झालेली आहे की काय ? चोरट्यांना धाकच उरला नसावा आशा ग्रामस्थां कडून प्रतिक्रिया व्यक्त होत असून तक्रार द्यायची किंवा नाही कारण तक्रार दिल्यावर सुद्धा काही एक निष्पन्न होत नसल्याने या विचारात शेतकरी होरपडत आहे. या चोरांचा पोलीस प्रशासनाने कायमचा बंदोबस्त करावा अशी तापी परिसरातील नागरिकांनी मागणी आहे.