विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आंबादास दानवे यांची निवड

ऑगस्ट 9, 2022 6:30 PM

ambadas danve jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निवडचे पत्र दानवे यांना दिले. शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यातूनच, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या पडत्या काळात मराठवाड्यातून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी खिंड लढवली. त्यामुळेच, अंबादास दानवेंना पक्षाने ही बढती दिल्याचे दिसून येत आहे.

ज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेनेने दावा सांगितलेला होता. उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली होती. त्यानुसार, आज अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now