फैजपूरमध्ये ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; नराधम अटकेत, न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

जुलै 1, 2026 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने तहान लागल्याचे सांगून ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

crime rape

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्री आरोपी पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे फैजपूर परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now