वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

crime 1 2 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीतील लक्ष्मीनगरात राहणाऱ्या वयोवृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लालचंद गणा राठोड (वय-६०) रा. लक्ष्मी नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील नवीन लक्ष्मीनगरात लालचंद गणा राठोड हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. लालचंद हे रेल्वे मालधक्क्यावर हमाली काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दरम्यान, शुक्रवारी 10 जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास लालचंद राठोड यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांचा मृतदेह खाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. लालचंद राठोड यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांचरू पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now