जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर मार्केटमध्ये चढ उतार दिसून येत आहे. काही शेअरमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान झाले.परंतु सध्या एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एकाच दिवसात या शेअर्समध्ये ६७ लाख टक्क्यांनी वाढ झाली आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड असं या शेअरचे नाव आहे. एल्सिड इन्व्हेसटमेंटचा शेअर हा देशातील सर्वात महागडा शेअर बनला आहे. हा शेअर एमआरएफच्या शेअर्सच्या दुप्पट झाला आहे.
BSE चा आकड्याने कॅलक्युलेट केलं, तर कोणी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, तर सध्या तो माणसू अब्जाधीश झाला असता. एक लाख रुपयाच्या एल्सिड सॉल्यूशनने 670 कोटी रुपये बनवले आहेत. या शेअरने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आणि ऐन दिवाळीत गुंतवणूकदारांची झोळी भरली.
मंगळवारी एल्सिड सॉल्यूशनच्या शेअरने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. कंपनीच्या शेअरमध्ये एकाच दिवसात 67 लाख टक्के वाढ दिसून आली. 3.53 रुपये प्रति शेअरचा भाव 2.36 लाख रुपयाच्या पुढे गेला. शेअर बाजाराच्या इतिहासात कदाचितच कुठल्या शेअरमध्ये इतकी वृद्धी दिसून आली असेल. शेअर बाजारातले जाणकार ही ऐतिहासिक तेजी असल्याचे म्हणत आहेत. अनेक रेकॉर्ड यामध्ये मोडले गेले. त्यामुळे संपूर्ण देशात या शेअरची चर्चा आहे.
Elcid कंपनी काय करते?
Elcid Investment Limited ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी एशियन पेंट्स लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपचादेखील भाग आहे. एशियन पेंट्स सुरु करणाऱ्यांमध्ये ४ हिस्सा या कंपनीचा आहे. या कंपनीच्या शेअरने काल मार्केटमध्ये मोठी झेप घेतली आहे.