आपण काय संत आहेत का? खडसेंवर गुलाबराव पाटील भडकले, नेमकं काय आहे प्रकरण?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२२ । भोसरी भूखंड प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावणाऱ्या भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा राजीनामा घ्यावा, असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले होते. आता यावरूनच मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आता एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) हल्लाबोल केला आहे.

काय म्हणले गुलाबराव पाटील?
भोसरी प्रकरण कोणी केलं, आपण काय संत आहेत का? आपलं बाळू आणि दुसऱ्याचं काळू असं कसं चालेल, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. पहिले आपल्या जावयाला सोडवा ते कोणत्या कारणावरून जेलमध्ये आहेत. त्यांना बाहेर काढा, ते का साधूसंत आहेत म्हणून जेलमध्ये आहेत का? तर कृपया करून त्यांनी आधी जावयाला बाहेर काढावे आणि मग एकनाथ शिंदेंवर आरोप करावा असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांचं टायटॅनिक जहाज बुडेल अशी टीका केली होती. यावर बोलताना गुलाबराव म्हणाले की, कुणी खोके म्हणा कुणी जहाज म्हणा मात्र आमच्या एकनाथ शिंदे यांची गाडी सुसाट भाग रही हैं, असे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिलं आहे.