⁠ 
शनिवार, मे 4, 2024

पण मी टरबुज्या म्हणणार नाही.. खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । नशिराबाद(Nashirabad) येथे रेशन कार्ड व बारा अंकी नंबर वाटप कार्यक्रम राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खडसे (eknath khadse) यांनी पुन्हा एकदा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं अशी टीका खडसे यांनी केली.

‘ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये चाळीस वर्ष हमाली केली उभ आयुष्य पक्षासाठी घातलं आणि नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊच नाव वगळण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला 70 वर्ष होऊन गेले मात्र खान्देशावर अन्याय करण्यात आला, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

70 वर्षात कोकणात नारायण राणे , मनोहर जोशी तसे तीन 3 मुख्यमंत्री झालेत विदर्भातील 4 मुख्यमंत्री झाले आणि पाचवा देवेंद्र फडणवीस झाला, मराठवाड्यातील विलासराव देशमुख,अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत मात्र नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदाचा अधिकार असतानाही सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही, चाळीस चाळीस वर्ष पक्षात आम्ही हमाली केली मात्र अधिकार असतानाही मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आल्याची खंत ही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.

हे देखील वाचा :