⁠ 
शनिवार, मे 18, 2024

तळीरामांनो सावधान ! जळगावात बनावट दारुचा कारखाना उध्वस्त, 75 लाखापेक्षा अधिकचा मुद्दामाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२४ । लोकसभा सार्विकत्रक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 एप्रिल, 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4 एप्रिल, 2024 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुवैदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला.

यावेळी शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्याअ निर्मिती करुन ते बाटलीत भरताना मिळून आले. या प्रकारणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 15 लाख 75 हजार किमंतीच्या 45 हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, 30 लाख 30 हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, 3 लाख किमंतीच्या 1 लाख रिकाम्या बाटल्या, 6 लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, 6 लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, 5 लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, 4 लाख 50 हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासहल किरकोळ व इतर साहित्य असा एकूण 75 लाख 64 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.