‘लाडकी बहीण’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ ; एकनाथ शिंदेंची घोषणा, काय आहे खास?

ऑगस्ट 18, 2025 3:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा केलीय. ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.

eknath shinde cm

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे.

“धर्मवीर आनंद दिघेंच्या काळात जेव्हा असे अन्याय झाले त्यावेळेस आनंद दिघेंनी तात्काळ मदत करायचे आणि दिलासा द्यायचे. त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम करायचे. म्हणूनच आम्ही आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमातून या मोहिमेला सुरुवात केली आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तक्रारी करता येतील. या तक्रारींची गुप्तता पाळली जाईल,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अन्याय झाला आहे तिथे न्याय देण्याचं काम शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. तसेच त्यांनी सध्या या योजनेअंतर्गत मदत हवी असल्यास 8828862288 आणि 8828892288 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप ग्रुप सुरु होईल असं एकनाथ शिंदे म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now