राज्यातील घडामोडीला वेग! मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत बोलावलं

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२३ । राज्यातील राजकीय घडामोडीला वेग आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीनं मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं मुंबईत हजर राहा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर असलेले सर्व मंत्री मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. आज दुपारी एक वाजण्यापूर्वी सर्व मंत्री मुंबईत हजर राहणार आहेत.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिमध्ये सर्व मंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रेबाबतच निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या बैठकीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश का दिले याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या बातमीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.