⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

एकनाथ शिंदेंनी फोडाफोडीच्या राजकारणात घेतली कार्यकर्त्याची काळजी, डॉक्टरांना केला फोन!

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । एकनाथ शिंदे हे ओळखले जातात ये त्यांच्या कार्यकर्त्यांवरील प्रेमामुळे. सध्या ते इतके बिझी असूनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या काळजीपोटी डॉक्टरांना फोन केला आणि त्यांच्या कार्यकर्त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. अधिक माहिती अशी कि, ‘हॅलो डॉक्टर, मी एकनाथ शिंदे बोलतोय. आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, काही लागलं तर सांगा. माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विनंती’. असं डोंबिवलीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवर एकनाथ शिंदे म्हणाले.

डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची तब्येत 21 तारखेला अचानक बिघडली त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवसैनिकाची तब्येत बिघडल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. 23 तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता शिंदेंनी डॉक्टरांना कॉल केला.आमचा कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची काळजी घ्या म्हणत विचारपूस केली.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 48 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आहे. यानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे.