कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी खडसेंनी घेतली आरोग्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांची भेट

मे 20, 2021 1:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१  राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बी.ए.एम.एस. गट-अ. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये कार्यमुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना परत सेवेत सामावुन घेण्यासंदर्भात माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली निमा-कॉन्ट्रैक्चुअल मेडीकल ऑफीसर फोरमचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर व संघटनेच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील व आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

rohini khadse eknath khadse

यावळी एकनाथराव खडसे यांनी सदरील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला कोरोना काळात सेवा दिलेली आहे, त्यांच्यावर होणारा अन्याय दुर करावा व कैबिनेट बैठकीत याविषयी चर्चा व्हावी अशी मागणी ना.जयंतराव पाटील यांना केली.

ना.पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांशी चर्चा करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यास सांगतो” असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जळगावचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हा सचिव मिलिंद लोणारी, पांडुरग नाफडे आदि उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now