---Advertisement---
मुक्ताईनगर

मंत्री अब्दुल सत्तारांची मुक्ताईनगरात प्रतिमा जाळली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । खासदार सुप्रिया सुळे व महिलांबद्दल बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्याने अडचणीत आलेल्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिमा मुक्ताईनगरात जाळण्यात आली तसेच सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केली.

muktainagar

मुक्ताईनगर शहरातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी सोमवारी सायंकाळी प्रवर्तन चौकामध्ये सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा जाळली. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले तसेच हिंदू बांधवांच्या भावना दुखावणारा ‘हर हर महादेव’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

---Advertisement---

यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, संजय पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, निवृत्ती पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, पवन पाटील, निलेश पाटील, विलास धायडे, प्रदीप साळुंखे, रामभाऊ पाटील, बी.डी.गवई, डॉ.बी.सी.महाजन, रवींद्र दांडगे, सुनील काटे, रणजीत गोयनका, नंदकिशोर हिरोळे, हरीष ससाणे, एजाज खान, सुभाष पाटील, प्रवीण कांडेलकर, प्रशांत भालशंकर, रउफ खान आदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---