---Advertisement---
जळगाव जिल्हा मुक्ताईनगर

कोणताही क्लास न लावता केली MPSC क्रॅक ; मुक्ताईनगरचा तरुण बनला PSI

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी लाखो तरुण-तरुणी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यासाठी काही जण महागडे क्लास लावत असतात. मात्र जळगावातील मुक्ताईनगरच्या तरुणाने कोणताही क्लास न लावता MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर माजी मारली. राऊष संजीव वाढे असं या तरुणाने नाव असून त्याची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.

Maharashtra Police Bharati 2022

राऊष यांच्या नियुक्तीनंतर संपूर्ण मुक्ताईनगर शहरात मिरवणूक काढून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे कोणतेही क्लासेस न लावता स्वकष्टातून व प्रचंड चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

---Advertisement---

त्यांनी बेसबॉल या खेळांमध्ये सहभाग घेवुनराज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चुणुक दाखविली. बेसबॉल या खेळात दोन वेळा राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारुन दोन वेळा सुवर्ण पदक प्राप्त केले. शिक्षणासोबतच त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु ठेवला. कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता त्यांनी हे यश संपादन केले. ते जे.ई. स्कूल व ज्यु. कॉलेजचे क्रीडाशिक्षक संजीव वाढे यांचे पुत्र आहे. यशाचे श्रेय ते आई, वडील, बहिण, भाऊ व मार्गदर्शक शिक्षकांना देतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment