जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्यातील शाळा ८ आणि ९ जुलै रोजी बंद राहणार असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. ही सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नाही, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे बंद राहणार असल्याचं समोर आले होते. मात्र आता शिक्षण विभागाने ८ आणि ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

कारण शिक्षक समन्वय संघाने जरी शाळा बंदची हाक दिली असली तरी, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शाळा बंद राहणार नाहीत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता उद्या आणि परवा (8 आणि 9 जुलै रोजी) राज्यातील कोणत्याही शाळा बंद राहणार नाहीय. याबतचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी आदेश जारी केले आहेत.

राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी 75 दिवसांचे आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, 14 ऑक्टोबर 2024 रोजी निघालेल्या सरकारी आदेशात (GR) अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. यामुळे निराश झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसलं.
कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागणीकडे सरकारने अद्यापही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. आश्वासने देऊनही त्यांची पूर्तता न झाल्याने आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात रणामुळे ८ आणि ९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.












