जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२४ । गृहिणींचे किचन बजेट किंचित वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाची यंदा विक्री १२ ते १५ टक्यांनी कमी झाली आहे. सर्वत्र हीच परिस्थिती असून पुढील महिन्यात मात्र तेलाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन तेल १०३ रुपये लिटर, सनफ्लावर ११० रुपये लिटर, शेंगदाणा तेल १६० ते २०० रुपये लिटर, मोहरीचे तेल १४५ रुपये लिटर तर तिळीचे तेल २२० रुपये लिटर भावाने विक्री होत आहे. दरम्यान, प्रथमच खाद्यतेलाच्या बाजारात मंदी असल्याचे विक्रेते सांगतात. मंदी असली तरी तेलाचे दर कमी होणार नसून ऑगस्ट महिन्यात सण-उत्सवाला सुरुवात होणार असल्याने दर वाढण्याची शक्यता असल्याचे खाद्यतेलाचे विक्रेते यांनी सांगितले आहे.