सर्वसामान्यांना दिलासा, खाद्य तेल झाले स्वस्त

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कारण देशातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे.

सध्या सोयाबीन तेलासह, सुर्यफूल तेल, मोहरीचे तेल आणि पाम तेल देखील काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तेलाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज अर्थ तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

सोयाबीनच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. सोयाबीनचा मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे तेल निर्मिती कंपन्यांना सध्या सोयाबिन स्वस्तात उपलब्ध होत आहे. तसेच दुसरीकडे केंद्राकडून देखील तेलावर आकारण्यात येणारे आयात शुक्ल कमी केल्याने तेलाच्या किमती या काहीप्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. तेलाच्या किमती कमी झाल्याने सर्वासामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोहरीच्या दरात देखील घट
सोयाबीनपाठोपाठ मोहरीच्या दरात देखील मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. मोहरीचे दर प्रति क्विटंल मागे तब्बल 600 रुपयांनी घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मोहरीला प्रति क्विटंल 8500-8525 रुपयांचा भाव मिळत होता. मात्र चालू आठवड्यात त्यामध्ये घसर होऊन मोहरीचे दर प्रति क्विटंल 7975-8025 च्या दरम्यान आले आहेत. मोहरी स्वस्त झाल्याने मोहरीच्या तेलाचे दर देखील घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाचा भाव 2390 रुपये प्रति पाच लिटर होता. तर चालू आठवड्यामध्ये तेलाच्या दरामध्ये 75 रुपयांची घट होऊन तेलाचे दर 2315 रुपयांवर पोहोचले आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -