⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

E – scooter In 499 : फक्त ४९९ रुपयात मिळावा ‘हि’ इ – स्कुटर


जळगाव लाईव्ह न्यूज । E scooter In 499 । सध्या संपूर्ण भारतामध्ये एका प्रकारे इलेक्ट्रिक वेहिकलची क्रेझ आली आहे. याच्या मागे दुसरे कोणताही कारण नसून एकच कारण आहे. ते म्हणजे सध्या वाढत असलेले पेट्रोलचे भाव. पेट्रोल परवडणार झालं नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर ई व्हेईकल घेत आहेत. अशावेळी समजा तुम्हाला जर कोणी सांगितलं तर की तुम्हाला केवळ 499 रुपयांमध्ये स्वतःची व्हेईकल मिळणार आहे तर? तर तुम्हाला आनंद होईल यात काही शंका नाही मात्र ही कोणतीही खोटी गोष्ट नसून ही एकदम खरी गोष्ट आहे देशातील सर्वसामान्य नागरिकांना केवळ 499 रुपयांमध्ये स्वतःची विकत घेता येणार आहे.

या Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 99,999 आहे. म्हणजेच १ लाख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहक 499 रुपयांमध्ये हे बुक करू शकतात. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे आणि नवीनतम Move3 ऑपरेटिंग सिस्टमसह येते. (E – scooter In 499)

संपूर्ण भारतामध्ये पेट्रोल दरवाढ होत आहे. पेट्रोलच्या या वाढत्या भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातच इतर वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे विज ही सर्वात स्वस्त असल्यामुळे नागरिक आपला कल इ व्हे व्हेईकलकडे (E- Vheical) वळवत आहेत. अशावेळी विविध कंपन्या भारतामध्ये आपल्या विविध इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या कंपन्या आपली ई व्हेईकल मार्केटमध्ये आणत आहेत. Ola Electric ने Ola S1 Pro चे स्वस्त मॉडेल लॉन्च केले आहे. या नवीन Ola इलेक्ट्रिक S1 स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. ओला इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये ३kWh बॅटरी प्लग लावले आहे. या प्लग ला एकदा तुम्ही चार्ज केले तर तब्बल 131 किलोमीटर पर्यंत ही ओला धावू शकते. ( Ola S1 Pro)