⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | भर उन्हाळ्यात तापी नदी दुथडी भरुन वाहू लागली

भर उन्हाळ्यात तापी नदी दुथडी भरुन वाहू लागली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ ।  तापी नदीला आवर्तन सोडल्याने भर उन्हाळ्यात सुर्य कन्या तापीमाई मुंगसे परिसरात दुथडी भरुन वाहू लागली आहे. तापी नदी पात्रात पाणीच पाणी पाहुन परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन महिन्यापासून तापी नदी पात्र हे कोरडे ठाक पडले होते. तापी नदीतून अमळनेर,चोपडा, धरणगाव, न. पा. यांच्या पाणी योजना पुरवठा केला जातो. आवर्तन सोडल्यामुळे गेले दोन दिवसापासून तापी नदी मुंगसे परिसरात दोन्ही काठ भरून, मुंगसे- तांदुळवाडी, सावखेडा- निमगव्हाण. धावडे – खाचणे. नांदेड- कुरवेल. रूंधाटी- दोंदवाडे. मठगव्हाण- घाडवेलपर्यंत वाहु लागली आहे. 

या दोन्ही काठच्या गावातील पशुधनाच्या  व गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. पुढील दोन महिने तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.