शॉर्टसर्कीटमुळे ऊस जळून खाक

एप्रिल 14, 2022 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । येथील नशिराबाद शिवारात शेतातील विद्युत तारांच्या शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत २ हेक्‍टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची घटना घडली.

आग jpg webp

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक अशोक नारखेडे (वय-३३) रा. खालची अळी, नशिराबाद यांचे नशिराबाद शिवारात शेत गट नंबर १५२/१ मध्ये २ हेक्टर ११ आर शेत असून येथे त्यांनी शेतात उसाची लागवड केली आहे. दरम्यान मंगळवार दि १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने शेतातील उसाला आग लागली. या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. यामध्ये शेतकरी दीपक नारखेडे यांचे ६ लाख ३० हजार रूपयांचा ऊस आणि २० हजार रुपये किमतीचे पाईप असे एकूण साडेसहा लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले. या संदर्भात दीपक नारखेडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी वरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now