जळगावातील मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री शिरला मद्यपी, अन्..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरातील एका मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या खोलीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अचानक मद्यपी व्यक्ती शिरला. विद्यार्थिनींनी आरडा-ओरडा करताच मद्यापीने थेट वसतिगृहातून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. हा प्रकार मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात मद्यपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य चौक परिसरातील एक मुलींचे वसतिगृह आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक मद्यापी हा वसतिगृहातील विद्यार्थिनी असलेल्या खोलीमध्ये जावून झोपून गेला. मध्यरात्री एका विद्यार्थिनीला जाग आल्यावर तिला मद्यपी व्यक्ती हा खोलीमध्ये दिसून आला. लागलीच हा प्रकार इतर मुलींच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली. त्यातच मद्यपी हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

अखेर त्याने वसतिगृहातून उडी मारून पळू लागला. विद्यार्थिनींसह शिक्षकांनी त्याचा भास्कर मार्केटपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांच्या मदतीने मद्यापीला पकडले. त्यानंतर शनिवारी एका विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून मद्यपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.