मद्यधूंद तलाठ्याचा अंडी विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा!

जुलै 24, 2022 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । एका तलाठ्याने दारु पिऊन अंडी विक्रेत्याच्या गाडीवर धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री रावेर शहरातील स्टेशन रोडवर घडली. या प्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.

crime raver jpg webp

तालुक्यातील एका गावातील तलाठ्याने रावेरातील एका अंडा पाव विक्री करणार्‍या विक्रेत्याच्या गाडीवर जावून विक्रेत्याशी डोके लावले व अंडी विक्रेत्याला कारवाईची धमकी देखील दिली. मात्र विक्रेत्याने देखील पोलिसात जाण्याची भूमिका घेता तळीराम तलाठ्याच्या अन्य सहकार्‍याने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडून दोघांनी धूम ठोकली असली तरी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, धिंगाणा घालणार्‍या तलाठ्याकडे असलेल्या गावापासून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक होते मात्र महसूल प्रशासनाचा छुपा असलेला आशीर्वाद यामुळे कारवाई होत नसल्याने अवैध गौण खनिज वाहतुकीला ऊत आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now