जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या यादीची इच्छुकांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती.

प्रशासनाने याद्या अंतिम करणे, महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोडींग करणे आणि संभाव्य चुकांची दुरुस्ती करण्याची पुनर्तपासणी युद्धपातळीवर केली. आज १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळीच याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. महापालिका इमारतीत दोन रुपये प्रति प्रत या दराने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून प्रशासनाने शहरातील ५१६ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि शहर अभियंता योगेश बोरोले यांनी नुकतीच मतदान यंत्रांची पाहणी केली आहे. दरम्यान, याआधी निवडणूक आयोगाने नवीन सुधारीत कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यक्रम आठवडाभर लांबणीवर पडला होता.
असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम
प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी – २० नोव्हेंबर
हरकती, सूचनांसाठी अंतिम दिनांक २७ नोव्हेंबर
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्धी – ५ डिसेंबर
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्धी – ८ डिसेंबर
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्धी- १२ डिसेंबर











