जळगाव जिल्हा

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल: डॉ. युवराज परदेशी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) माध्यम क्षेत्रात बहुविध पद्धतीने वापर करून वेग आणि मजकुराची गुणवत्ता (Quality) राखता येत असल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) माध्यम क्षेत्रासाठी पूरकच ठरेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. युवराज परदेशी (Dr Yuvraj Pardeshi) यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र (Maharashtra State Newspaper) व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या (Media Accreditation Committee) बैठकीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर समिती सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

यावेळी राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी (Yadu Joshi) , माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक सर्वश्री डॉ. गणेश मुळे (Ganesh Mule), किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे, कृत्रिम तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ तसेच कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तुषार भांबरे (Tushar Bhambare), यांच्यासह समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी, कंटेंट ओशन इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रजत भोळे (Rajat Bhole), ऍपड्रॉइडचे संचालक चेतन गिरनारे (Chetan Girnare) उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. परदेशी म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्याचा उपयोग होत आहे. माहितीचे विश्लेषण, संदर्भ मिळवण्यासाठी आणि कमीत कमी वेळात ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच विषयावरील माहितीचे अनेकप्रकारे विश्लेषण एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येते. बातमी लेखन करताना ते उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य समितीचे अध्यक्ष श्री. जोशी यांनी, एआय तंत्रज्ञानाचा उपयोग हा पत्रकारितेत सकारात्मक पद्धतीने आवश्यक आहे. पत्रकाराची बातमी लिहितानाची संवेदना यासाठी एआय तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. पत्रकाराचा अभ्यास, संवेदनशीलता, बातमी शोधण्याचे कसब याची तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यास प्रभावी पत्रकारिता करता येते, असे सांगितले. यावेळी डॉ. परदेशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यम क्षेत्रातील उपयोगाबाबत विविध पैलूंची माहिती दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button